Thursday, January 1, 2009

मला आठवतोय तो दिवस...

बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
मला आठवतोय तो दिवस... ४ जानेवारी २००५ !
१०९ व्या "कॉंग्रेस'मधल्या एक तृतीयांश नवनिर्वाचित सदस्यांचा त्या दिवशी शपथविधी झाला. त्यामध्ये माझीही वर्णी लागली होती. जानेवारी महिना असूनही हवा चक्‍क उबदार होती आणि स्वच्छ सूर्यप्रकाशही होता. माझ्या शपथविधी समारंभासाठी माझे कुटुंबीय, माझे सुहृद इलिनॉय, हवाई, लंडन, केनियातून आले होते. हे सर्वजण वरच्या प्रेक्षागॅलरीत होते. नितळ संगमरवरी मंचावर मी उजवा हात उंचावून शपथ घेत होतो. त्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांच्या समवेत मी, माझी पत्नी मिशेल, कन्या मॅलिया (त्यावेळी वय वर्षे सहा) आणि लहान कन्या साशा (वय वर्षे ३) यांचा "फोटो' चा कार्यक्रम झाला. मॅलियाचा हातमिळवणी करतानाचा संकोच आणि धाकट्या साशाने उपराष्ट्राध्यक्षांना दिलेली टाळी अजून माझ्या स्मरणात आहे. गुलाबी आणि लाल रंगाचे फ्रॉक फुलपाखरासारखे उडवत "कॅपिटॉल'च्या पायऱ्या दुडक्‍या चालीने उतरणाऱ्या माझ्या या गोड मुली. त्याही "सुप्रीम कोर्टा'च्या संगमरवरी महाकाय स्तंभांच्या पार्श्वभूमीवर ! हे दृश्‍य मी कसं विसरीन ? नंतर आम्ही चौघंही "लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'च्या दिशेने वळलो. माझे मित्र, हितचिंतक यांच्यासोबत मोठ्या आनंदात वेळ गेला. त्या दिवशी स्मितहास्य, हस्तांदोलनं, नट्टापट्टा, हर्षोल्हास असं वातावरण होतं वॉशिंग्टनमध्ये ! पण माझ्या मनात पुसटशी शंका होती. उद्याचा दिवस असाच असेल का ? की नसेलच. आलेली मित्रमंडळी परतली. थंडीतल्या त्या संध्याकाळी सूर्यास्त झाला. तो दिवस मावळला आणि कटू वास्तव समोर आलं. राजकीयदृष्ट्या देश दुभंगला होता. "वॉशिंग्टन' दुभंगलं होतं - दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात हे प्रथमच घडत होतं.
(क्रमशः)
-------------------------------------------------------
(अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा)

No comments: