बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
मी हसलो आणि राष्ट्राध्यक्षांना दरवाजापर्यंत सोडायला गेलो. तेवढ्यातल्या तेवढ्यात निवडणूक मोहिमेतले काही किस्सेही त्यांना ऐकवायची संधी मी सोडली नाही. मी त्यांच्याशी बोलण्यात अगदी पुरता रंगलो होतो. इतक्यात आजूबाजूला विशेषतः सुरक्षा रक्षकांमध्ये काही तरी खुसपुस मला जाणवली. पाह्यलं, तर सुरक्षा रक्षकांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव होते. काही तरी विचित्र बघितल्यासारखे ! मला कळेचना, सगळं छान सुरू असताना या सुरक्षा रक्षकांचं काय बिनसलं असावं?
क्षणभर मीही विचार केला आणि एकदम काय घोळ झालाय, ते माझ्या लक्षात आलं. बोलता बोलता, सवयीने मी माझा हात राष्ट्राध्यक्षांच्या... अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या खांद्यावर टाकला होता. आणि म्हणून सारेजण काहीसे अचंबित... काहीसे त्रस्त, बेचैन आणि काहीसे वैतागलेले दिसत होते.
ही माझी अगदी नेहमीची सवय ! बोलता बोलता चटकन् खांद्यावर हात टाकण्याची ! खरं सांगायचं, तर माझ्या या सवयीमुळे मला भरपूर मित्रही मिळालेत. पण...
पण इथं साक्षात् राष्ट्राध्यक्ष होते, हे मी क्षणभर विसरूनच गेलो होतो.
(क्रमशः)
------------------------------------------------------
(अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment