बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
रात्र पडली की एकट्यानंच झोपायचीही सवय नव्यानंच करून घ्यावी लागली होती. मिशेलनी आणि मी ठरवलं होतं की तिनं शिकागोतच राहावं, त्यामुळे आमच्या मुलींचं शिक्षण सुरळीतपणे सुरू राहणार होतं. "वॉशिग्टन'मधली गजबज त्यांच्या अंगवळणी पडणार नव्हती. शिवाय मिशेललाही तिची आई, भाऊ, मित्रमंडळींची मदत होत राहील. या विचाराने मिशेल अन् मुली तिथंच राहिल्या. आठवड्यातले तीन दिवस माझं वास्तव्य वॉशिंग्टनमध्ये असे. म्हणून मी एक छोटा फ्लॅट भाड्याने घेतला. "कॅपिटॉल हिल' आणि मुख्य शहर यांच्यामध्ये आणि जॉर्ज टाऊन लॉ स्कूलजवळ अशी ही जागा होती.प्रथम मला या एकांतवासाची मोठी मजा वाटत होती. म्हटलं, जरा मजा करू या. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं, रात्री उशीरापर्यंत बास्केटबॉल मॅचेस बघणं, वाचन करणं, भररात्री जिममध्ये व्यायाम करणं, भांडी न विसळता सिंकमध्ये तशीच ठेवणं, अंथरुण आवरून न ठेवणं - अशी मनसोक्त मजा करू. पण माझ्या लग्नाला तोपर्यंत तेरा वर्षं झाली होती. मी अगदी घरगृहस्थीवाला "माईल्ड' माणूस झालो होतो. पहिल्या दिवशी आंघोळ करताना लक्षात आलं, पाणी बाहेर उडू नये म्हणून लावण्याचा पडदा खरेदी करयचा मी विसरलो होतो. म्हणून भिंतीच्या कडेकडेला शॉवरचं तोंड वळवून कशीबशी आंघोळ उरकावी लागली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कोचावर आरामात बीअर पीत मी मॅच बघत बसलो, बसल्याबसल्या डुलकी लागली. जाग आली ती माझी मान आखडली म्हणूनच ! बाहेरच्या अन्नाचीही कालांतराने चव लागेना. घरातली शांतताही खायला उठू लागली. मी वारंवार घरी फोन करू लागलो. मुलींशी गप्पा, त्यांचा सहवास यासाठी मी आसुसलो होतो.
(क्रमशः)
------------------------------------------------------
(अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा)
Monday, January 19, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
बराक ओबामा आज पदभार स्विकारत आहेत. याचा भारतावर काय परिणाम होईल याबद्दल शंका आहे. भारतावर याचे चांगले परिणाम होतील ही अपेक्षा.
दिनेश.
दिनेश.
http://www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com
Post a Comment