Wednesday, December 24, 2008

ओसामा आणि ओबामा...

बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
"द ऑडॅसिटी ऑफ होप - धारिष्ट्य... आशावादाचं !
'२००१ च्या सप्टेंबर महिन्यातली गोष्ट. राज्यपातळीवरच्या निवडणूका घोषित झाल्या होत्या. मी आणि माझा प्रचार सल्लागार जेवणासाठी एकत्र जमलो होतो. अनेक विषयांवरच्या गप्पा सुरू होत्या.
बोलता बोलता तो म्हणाला, "राजकीय पटलावर किती बदल होताहेत ना ?''"म्हणजे काय रे बाबा ?'' त्याला नक्‍की काय म्हणायचंय ते न कळल्यानं मी विचारलं. त्याच्याजवळचं वर्तमानपत्र त्यानं माझ्यासमोर उलगडलं.
त्याच्याकडे निर्देश करत तो म्हणाला, ""काय भयानक आहे हे सारं?'' मी समोरच्या वर्तमानपत्रावर नजर फिरवली. त्यात ओसामा बिन लादेनचा फोटो छापला होता.
माझा प्रचार सल्लागार म्हणाला, ""ओबामा, आता तू तुझं नाव बदलूही शकत नाहीत. करीयर सुरू करताना तू ठरवलं असतंस, तर ते तुला त्यावेळी शक्‍य तरी होतं. एखादं दुसरं सहज बोलण्यात वापरलं जाणारं नाव तुला घेता आलं असतं; पण तेव्हा. आता नाही. या नावामुळे तुझ्याबाबतीत सारा घोटाळाच होणार, अशी भीती वाटतीय.''
(क्रमशः)
-------------------------------------------------------
(अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा)

No comments: