बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
रात्र पडली की एकट्यानंच झोपायचीही सवय नव्यानंच करून घ्यावी लागली होती. मिशेलनी आणि मी ठरवलं होतं की तिनं शिकागोतच राहावं, त्यामुळे आमच्या मुलींचं शिक्षण सुरळीतपणे सुरू राहणार होतं. "वॉशिग्टन'मधली गजबज त्यांच्या अंगवळणी पडणार नव्हती. शिवाय मिशेललाही तिची आई, भाऊ, मित्रमंडळींची मदत होत राहील. या विचाराने मिशेल अन् मुली तिथंच राहिल्या. आठवड्यातले तीन दिवस माझं वास्तव्य वॉशिंग्टनमध्ये असे. म्हणून मी एक छोटा फ्लॅट भाड्याने घेतला. "कॅपिटॉल हिल' आणि मुख्य शहर यांच्यामध्ये आणि जॉर्ज टाऊन लॉ स्कूलजवळ अशी ही जागा होती.प्रथम मला या एकांतवासाची मोठी मजा वाटत होती. म्हटलं, जरा मजा करू या. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं, रात्री उशीरापर्यंत बास्केटबॉल मॅचेस बघणं, वाचन करणं, भररात्री जिममध्ये व्यायाम करणं, भांडी न विसळता सिंकमध्ये तशीच ठेवणं, अंथरुण आवरून न ठेवणं - अशी मनसोक्त मजा करू. पण माझ्या लग्नाला तोपर्यंत तेरा वर्षं झाली होती. मी अगदी घरगृहस्थीवाला "माईल्ड' माणूस झालो होतो. पहिल्या दिवशी आंघोळ करताना लक्षात आलं, पाणी बाहेर उडू नये म्हणून लावण्याचा पडदा खरेदी करयचा मी विसरलो होतो. म्हणून भिंतीच्या कडेकडेला शॉवरचं तोंड वळवून कशीबशी आंघोळ उरकावी लागली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कोचावर आरामात बीअर पीत मी मॅच बघत बसलो, बसल्याबसल्या डुलकी लागली. जाग आली ती माझी मान आखडली म्हणूनच ! बाहेरच्या अन्नाचीही कालांतराने चव लागेना. घरातली शांतताही खायला उठू लागली. मी वारंवार घरी फोन करू लागलो. मुलींशी गप्पा, त्यांचा सहवास यासाठी मी आसुसलो होतो.
(क्रमशः)
------------------------------------------------------
(अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा)
Monday, January 19, 2009
Wednesday, January 14, 2009
"व्हाईट हाऊस'चं पहिलं दर्शन...
बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
मला "व्हाईट हाऊस'चं पहिलं दर्शन घडलं ते १९८४ मध्ये. मी कॉलेजमधून नुकताच पास झालो होतो आणि न्यूयॉर्कमधल्या सिटी कॉलेजच्या "हार्लेम' प्रभागात कम्युनिटी ऑर्गनायझर म्हणून काम पाहू लागलो होतो. राष्ट्राध्यक्ष रेगन यांचा विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीत कपात करण्याचा विचार होता, त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांत जागृती निर्माण करण्याचं काम मी हाती घेतलं होतं. या विद्यार्थ्यांमध्ये बरेच नेते कृष्णवर्णीय, पूर्व युरोपियन होते. अशा सर्वांना एकत्र करून आमच्या मागण्या न्यूयॉर्कच्या कॉंग्रेसच्या प्रतिनिधी मंडळापुढं मांडणं, या कामगिरीत मी गुंतलो होतो.
"व्हाईट हाऊस'ची ही भेट तशी धावतीच होती. आमचा बराच वेळ "रेबर्न बिल्डिंग'मधल्या या पॅसेजमधून त्या पॅसेजमध्ये भटकण्यात आणि "कॅपिटॉल हिल'मधल्या कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवी करून घेण्यातच गेला. बरेचसे कर्मचारी माझ्याच वयाचे होते, काही थोडेसेच जण वयस्कर वाटत होते. शेवटी आमचा घोळका "मॉल' आणि "वॉशिंग्टन स्मारका'कडे वळला आणि आहा ! आम्हाला समोर "व्हाईट हाऊस' दिसलं. आधी औत्सुक्याने, मग कौतुकाने आणि नंतर टक लावून आम्ही "व्हाईट हाऊस' बघितलं. "पेनसिल्व्हानिया अव्हेन्यू'मधल्या "मरीन्स'च्या सुरक्षा चौकीमागेच "व्हाईट हाऊस'चं मुख्य प्रवेशद्वार होतं, पदपथावरून पादचारी चालले होते तर रस्त्यावरून वाहनांची रहदारी सुरूच होती. मला आश्चर्य आणि कौतुक वाटलं. एवढी भव्य वास्तु आणि तिला लागून असलेली माणसांची - वाहनांची वर्दळ ! आम्हीसुद्धा प्रवेशद्वाराच्या किती जवळ होतो, तिथून वळून दुसऱ्या बाजूला गेलो तेव्हाही "व्हाईट हाऊस'ची दुसरी बाजू, तिथलं "रोझ गार्डन' आणि निवास दृष्टीस पडले. "व्हाईट हाऊस'चा हा मोकळेढाकळेपणा हा आमच्या लोकशाहीवर असलेल्या विश्वासाचं प्रतीकच भासला. आमचे नेते हे आमच्यासारख्या सर्वसामान्यांमधूनच आलेले आहेत, त्यांची कायद्याशी बांधिलकी आहे आणि त्यांना आम्हा सर्वसामान्यांची एकमुखाने मान्यता आहे, हे मला जाणवलं. हे साल होतं १९८४ !

Friday, January 9, 2009
सवयीने मी माझा हात राष्ट्राध्यक्षांच्या...
बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
मी हसलो आणि राष्ट्राध्यक्षांना दरवाजापर्यंत सोडायला गेलो. तेवढ्यातल्या तेवढ्यात निवडणूक मोहिमेतले काही किस्सेही त्यांना ऐकवायची संधी मी सोडली नाही. मी त्यांच्याशी बोलण्यात अगदी पुरता रंगलो होतो. इतक्यात आजूबाजूला विशेषतः सुरक्षा रक्षकांमध्ये काही तरी खुसपुस मला जाणवली. पाह्यलं, तर सुरक्षा रक्षकांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव होते. काही तरी विचित्र बघितल्यासारखे ! मला कळेचना, सगळं छान सुरू असताना या सुरक्षा रक्षकांचं काय बिनसलं असावं?
क्षणभर मीही विचार केला आणि एकदम काय घोळ झालाय, ते माझ्या लक्षात आलं. बोलता बोलता, सवयीने मी माझा हात राष्ट्राध्यक्षांच्या... अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या खांद्यावर टाकला होता. आणि म्हणून सारेजण काहीसे अचंबित... काहीसे त्रस्त, बेचैन आणि काहीसे वैतागलेले दिसत होते.
ही माझी अगदी नेहमीची सवय ! बोलता बोलता चटकन् खांद्यावर हात टाकण्याची ! खरं सांगायचं, तर माझ्या या सवयीमुळे मला भरपूर मित्रही मिळालेत. पण...
पण इथं साक्षात् राष्ट्राध्यक्ष होते, हे मी क्षणभर विसरूनच गेलो होतो.

Monday, January 5, 2009
"अमेरिकन' मन कसं कळणार?
बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
१९६० च्या दशकाशी माझी खास प्रकारे नाळ जोडलेली आहे, असं मला नेहमी वाटतं. एक प्रकारे जणू हा माझाच काळ होता. संमिश्र विवाहाचे मी एक अपत्य ! समाजात उलथापालथ झाली नसती तर त्याला कुठलीही संधी मिळाली नसती. पण या घटनांचा परिणाम जाणवण्याचं माझं वयच नव्हतं. हवाई बेटं आणि नंतर इंडोनेशियात माझं बालपण गेलं. मला तेव्हाचं "अमेरिकन' मन कसं कळणार ? माझी आई खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवादी होती, तिच्याकडून माझं थोडफार प्रबोधन झालं, माझ्या जाणीवा घट्ट झाल्या - हीच माझी तत्कालीन घटनांची जाण असं म्हणता येईल. समान नागरी कायद्याच्या चळवळीमुळे तिच्या भूमिकेत ठामपणा आला. आलेल्या संधीचं सोनं करायचं ते सहनशीलता, समानता, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करूनच - हे तिनेच माझ्यावर बिंबवले.
१९६० च्या दशकातल्या घटनांची माझ्या आईला असलेली जाण तशी मर्यादितच होती. एकतर ती अमेरिकेच्या मुख्य भूमीपासून लांब - हवाई व नंतर इंडोनेशियात राहत होती, आणि ती थोडीशी स्वप्नाळूही होती. कृष्णवर्णीयांचे प्रश्न असोत वा स्त्रीमुक्तीवादाचा विचार असो, कुठलयाही प्रश्नावर आक्रस्ताळेपणा करून मत व्यक्त करण्याचा तिचा स्वभावच नव्हता. स्वातंत्र्यवादाच्या तिच्या कल्पना १९६७ पूर्व काळातच कुपीबंद झाल्या होत्या. त्या कालकुपीत अंतरिक्ष कार्यक्रम, शांतिसैनिक, स्वातंत्र्यवादी प्रचारफेऱ्या आणि महालिया जॅक्सन आणि जोन बेझ अशा नेत्यांबाबतच्या स्वप्नाळू प्रतिमा तिने जपल्या होत्या.

Thursday, January 1, 2009
मला आठवतोय तो दिवस...
बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
मला आठवतोय तो दिवस... ४ जानेवारी २००५ !
१०९ व्या "कॉंग्रेस'मधल्या एक तृतीयांश नवनिर्वाचित सदस्यांचा त्या दिवशी शपथविधी झाला. त्यामध्ये माझीही वर्णी लागली होती. जानेवारी महिना असूनही हवा चक्क उबदार होती आणि स्वच्छ सूर्यप्रकाशही होता. माझ्या शपथविधी समारंभासाठी माझे कुटुंबीय, माझे सुहृद इलिनॉय, हवाई, लंडन, केनियातून आले होते. हे सर्वजण वरच्या प्रेक्षागॅलरीत होते. नितळ संगमरवरी मंचावर मी उजवा हात उंचावून शपथ घेत होतो. त्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांच्या समवेत मी, माझी पत्नी मिशेल, कन्या मॅलिया (त्यावेळी वय वर्षे सहा) आणि लहान कन्या साशा (वय वर्षे ३) यांचा "फोटो' चा कार्यक्रम झाला. मॅलियाचा हातमिळवणी करतानाचा संकोच आणि धाकट्या साशाने उपराष्ट्राध्यक्षांना दिलेली टाळी अजून माझ्या स्मरणात आहे. गुलाबी आणि लाल रंगाचे फ्रॉक फुलपाखरासारखे उडवत "कॅपिटॉल'च्या पायऱ्या दुडक्या चालीने उतरणाऱ्या माझ्या या गोड मुली. त्याही "सुप्रीम कोर्टा'च्या संगमरवरी महाकाय स्तंभांच्या पार्श्वभूमीवर ! हे दृश्य मी कसं विसरीन ? नंतर आम्ही चौघंही "लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'च्या दिशेने वळलो. माझे मित्र, हितचिंतक यांच्यासोबत मोठ्या आनंदात वेळ गेला. त्या दिवशी स्मितहास्य, हस्तांदोलनं, नट्टापट्टा, हर्षोल्हास असं वातावरण होतं वॉशिंग्टनमध्ये ! पण माझ्या मनात पुसटशी शंका होती. उद्याचा दिवस असाच असेल का ? की नसेलच. आलेली मित्रमंडळी परतली. थंडीतल्या त्या संध्याकाळी सूर्यास्त झाला. तो दिवस मावळला आणि कटू वास्तव समोर आलं. राजकीयदृष्ट्या देश दुभंगला होता. "वॉशिंग्टन' दुभंगलं होतं - दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात हे प्रथमच घडत होतं.

Wednesday, December 24, 2008
ओसामा आणि ओबामा...
बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
"द ऑडॅसिटी ऑफ होप - धारिष्ट्य... आशावादाचं !
'२००१ च्या सप्टेंबर महिन्यातली गोष्ट. राज्यपातळीवरच्या निवडणूका घोषित झाल्या होत्या. मी आणि माझा प्रचार सल्लागार जेवणासाठी एकत्र जमलो होतो. अनेक विषयांवरच्या गप्पा सुरू होत्या.
बोलता बोलता तो म्हणाला, "राजकीय पटलावर किती बदल होताहेत ना ?''"म्हणजे काय रे बाबा ?'' त्याला नक्की काय म्हणायचंय ते न कळल्यानं मी विचारलं. त्याच्याजवळचं वर्तमानपत्र त्यानं माझ्यासमोर उलगडलं.
त्याच्याकडे निर्देश करत तो म्हणाला, ""काय भयानक आहे हे सारं?'' मी समोरच्या वर्तमानपत्रावर नजर फिरवली. त्यात ओसामा बिन लादेनचा फोटो छापला होता.
माझा प्रचार सल्लागार म्हणाला, ""ओबामा, आता तू तुझं नाव बदलूही शकत नाहीत. करीयर सुरू करताना तू ठरवलं असतंस, तर ते तुला त्यावेळी शक्य तरी होतं. एखादं दुसरं सहज बोलण्यात वापरलं जाणारं नाव तुला घेता आलं असतं; पण तेव्हा. आता नाही. या नावामुळे तुझ्याबाबतीत सारा घोटाळाच होणार, अशी भीती वाटतीय.''

Tuesday, December 9, 2008
ऑ़डॅसिटी ऑफ होप

मूळ किंमत 330 रूपये.
सवलतीची नोंदणी किंमत 240 रुपये.
260 रुपयांचा पुणे येथे Payble चेक / डीडी अमेय प्रकाशन नावाने पाठवा.
पुस्तके पोस्टाने / कुरिअरने पाठवू.
भारताबाहेरील ऑर्डर असल्यास एकूण 550 रुपयांचा पुणे येथेPayble चेक / डीडी अमेय प्रकाशन नावाने पाठवा.
पुस्तके Airmail ने पाठवू.
प्रकाशनपूर्व सवलत नोंदणी 31 डिसेंबर 2008 पर्यंत
पुस्तक प्रकाशन दिनांक 15 जानेवारी 2009.
पत्ता
अमेय प्रकाशन
Subscribe to:
Posts (Atom)